गोवा

गोव्यात मासळीची आवक वाढली

दिनेश चोरगे

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : मागील आठवड्यापासुन मासळीची आवक चांगलीच वाढली आहे. बाजारात ताजी मासळी उपलब्ध होत असल्याने खवय्ये आनंदी दिसत आहेत. दक्षिण गोव्यातील मडगाव बाजारात इसवणची ९५० रुपये तर टायगर प्रॉन्स ६०० रुपये किलोने विक्री होत आहे. दर वाढले तरी या मासळीला मोठी मागणी आहे.

आठवड्याभरापूर्वी इसवण सुमारे ६५०, तर टायगर प्रॉन्स १५० ते १८० रुपये किलोने विक्रीस होता. दक्षिण गोव्यातील मडगावातील मासळी बाजार हा मुख्य मासळी बाजार आहे. नाताळाचे वेध लागल्याने बाजारात मोठी उलाढाल होत आहे. इसवण आणि टायगर प्रॉन्सच्या दरात वाढ झाली आहे. सुमारे २०० रुपयांना १० ते १५ बांगड्यांची विक्री होत असून तारले ३५० रुपये किलो दराने विकले जात आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मासळीचे दर झपाट्याने वाढत आहेत. घाऊक मासळी बाजारात रविवारी मोठी गर्दी होती.

मडगाव बाजारातील मासळीचे दर

मासळी दर
इसवण 950 किलो
कोळंबी 250 किलो
टायगर प्रॉन्स 600 किलो
तारले 450 किलो
बांगडे 250 किलो
पापलेट 400 किलो
कर्ली 250 वाटा
मुड्डोशो 350 वाटा

अंडी
बॉयलर कोंबडी : 70 रु. डझन
बदक : 120 रु. डझन

चिकन : 130 ते 140 रु.
मटण : 550 ते 700 रु.

पणजीत पापलेटचे दर आवाक्याबाहेरच

पणजी मासळी बाजारात पापलेटचा दर १०० रुपयांनी कमी झाला आहे, तथापि, पापलेट अजूनही भाव खात आहे. ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. तर प्रॉन्सचा दर १०० रुपयांनी वाढला आहे. गेल्या रविवारी पापलेट १२०० रुपये किलो, तर प्रॉन्स ३०० रुपये किलो होते. गोव्यात बहुतेक पर्यटक गोव्यात खास मासे खाण्यासाठी येतात. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांकडून मासळीला मोठी मागणी असते. पणजी मासळी बाजारातील दर (किलोमध्ये) : इसवण ८०० रु., कोळंबी ४०० रु., टायगर प्रॉन्स ६०० रु., तारले १०० ते २०० रु., बांगडे २०० रु., काळे पापलेट (सरंगा) ५०० ते ६००रु., पांढरे पापलेट ११० रु., कर्ली १०० ते २०० रु. (नग), मुड्डोशी २०० रु. (वाटा), वेर्ले २०० रु. (वाटा), लेपो २०० रु. (वाटा), पेडवे १०० ते २०० रु. (किलो)

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT