Goa Fire News 
गोवा

Goa Fire News | चार वाहनांना भीषण आग; 60 लाखांहून अधिक नुकसान

Goa Fire News | नावेलीतील रेबेलो ज्वेल्स अपार्टमेंटच्या पार्किंगमधील घटना

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
नावेली येथील रोझरी कॉलेजजवळ असलेल्या रेबेलो ज्वेल्स अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील पार्किंगमध्ये चार वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. आगीमध्ये पार्किंगमधील तीन कार आणि एका दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार ६० लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याची माहिती आहे.

आग लागली त्यावेळी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर तीन जण अडकले होते. आगीचा धूर आणि वाढता धोका लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले आणि तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या तिन्ही व्यक्तींची सुखरूप सुटका केली.

बचावण्यात आलेल्यांमध्ये रिवा रेबेलो (वय ३५), रोना रेबेलो (१९) आणि मेस्सी रेबेलो (१७) यांचा समावेश आहे. तिन्ही व्यक्तींना सुरक्षितपणे इमारतीबाहेर आणण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीमध्ये चार वाहने जळून मोठे नुकसान झाले आहे. मात्र, आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT