पणजी : पेडणे तालुक्यातील मांद्रे येथील यश शूटिंग अकादमीला आग लागल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग लागल्याचे समजतात अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत साहित्य जळाल्याने योगेश पाडलोसकर यांचे मोठे नुकसान झाले आहे.