Ponda Accident. 
गोवा

Ponda Accident | चालक खाली उतरताच ट्रक झाला न्यूट्रल; फर्मागुडीमध्ये मालवाहू ट्रकचा अपघात

Ponda Accident | फोंडा पणजी महामार्गावरील फर्मागुडी येथे मालवाहू ट्रक अचानक रस्ता सोडून उद्यानात घुसल्याने मोठा बाका प्रसंग उद्भवला.

पुढारी वृत्तसेवा

  • फोंडा-पणजी महामार्गावरील फर्मागुडी येथे मालवाहू ट्रक अचानक रस्ता सोडून उद्यानात घुसला.

  • चालक पत्ता विचारण्यासाठी खाली उतरताच ट्रक न्यूट्रल होऊन थेट कुंपण तोडत उद्यानात शिरला.

  • भाऊसाहेब बांदोडकरांच्या पुतळ्याजवळ गाडी थांबली नसती तर मोठी जीवितहानी झाली असती.

  • सकाळच्या वेळेमुळे परिसर रिकामा असल्याने कोणतीही जखमी किंवा हानी झाली नाही.

फोंडा : पुढारी वृत्तसेवा

फोंडा पणजी महामार्गावरील फर्मागुडी येथे मालवाहू ट्रक अचानक रस्ता सोडून उद्यानात घुसल्याने मोठा बाका प्रसंग उद्भवला. हा अपघात मंगळवारी सकाळी घडला. सुदैवाने या दूर्घटनेवेळी जवळपास कुणीच नसल्याने जीवितहानी टळली.

गोव्यात माल घेऊन आलेला हा ट्रक फर्मागुढीला पोचल्यावर चालकाने माल पोचवण्यासाठी संबंधित ठिकाणाचा पत्ता विचारण्यासाठी गाडी थांबवली आणि खाली उतरला. मात्र, चालक गाडीतून उतरल्याबरोबर गाडी न्यूट्रल होऊन थेट भाऊसाहेब बांदोडकरांचा पुतळा असलेल्या उद्यानात कुंपण मोडून आत घुसली आणि सुदैवाने थांबली. या घटनेमुळे जवळचे लोक धाऊन आले, काहिसा गोंधळ उडाला पण सगळे काही आलबेल असल्याचे समजल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT