FDA seizure 130 kg Mawa file photo
गोवा

FDA Goa Food | दक्षिण गोव्यात 430 किलो अन्नपदार्थ नष्ट

FDA Goa Food | मडगाव बसस्थानकावर तपासणी मोहीम ; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षिण गोवा पथकाने मडगाव येथील केटीसी बसस्थानकावर तपासणी मोहीम राबवली. आंतरराज्य बसमधून वाहतूक होणाऱ्या विविध खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात आली. यावेळी लोणचे, स्टोन चॉकलेट, हिंगगोळी, पान आणि गोड आवळा असे सुमारे २३ किलो खाद्यपदार्थ आढळले.

या पदार्थांवर एफएसएसएआयच्या नियमानुसार आवश्यक लेबल नव्हते. त्यांची किंमत सुमारे ८ हजार रुपये होती. तसेच सुमारे ३० किलो बटाटा वेफर्स त्याची किंमत ९ हजार रुपये असून यावर उत्पादन व वापराची तारीख तसेच एफएसएसएआय परवाना क्रमांकाची योग्य नोंद नसल्याचे आढळले. पुण्याहून बसने आणलेल्या बर्फाच्या एका पार्सलचीही तपासणी करण्यात आली.

पुण्यात तयार करण्यात आलेल्या या बर्फावर गोव्यातील उत्पादन केंद्राचा एफएसएसएआय परवाना क्रमांक नमूद करण्यात आला होता. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचे आढळले. सुमारे २०० किलो बर्फ, किंमत १२ हजार रुपये, जप्त करण्यात आला.

शिरवई, केपे येथील एका उत्पादन केंद्राची तपासणी केली असता ४५ हजार रुपये किमतीचा १५० किलो कलाकंद आढळला. त्यावर आवश्यक लेबल, बॅच क्रमांक आणि वापरण्याची अंतिम तारीख नमूद नव्हती. तसेच त्यात हिरवा रंग मिसळण्यात आला होता.
केपे येथील शेल्डेममधील आणखी एका उत्पादन केंद्राच्या तपासणीत ११ हजार ८८० रुपये किमतीचा २७ किलो मावा आढळला. त्यावर योग्य लेबल व एफएसएसएआय परवाना क्रमांक नव्हता. तसेच त्यात रंग मिसळण्यात आला होता.

वरील सर्व कारवाईत सुमारे ४३० किलो अन्नपदार्थ, एकूण ८५ हजार ८८० रुपये किमतीचा साठा, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी नष्ट करण्यात आला. या मोहिमेत नियुक्त अधिकारी संज्योत कुडाळकर, वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी माधव, प्रिया, अन्न सुरक्षा अधिकारी अमरदीप, अभिषेक, प्रिया आणि एमटीएस गौरेश सहभागी झाले होते.
दरम्यान, धारबांदोडा तालुक्यातही तपासणी मोहीम राबवण्यात आली. यावेळी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी विविध मिठाईचे १५ नमुने तपासणीसाठी घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT