पणजी : अपंग मुलीवरील बलात्कारप्रकरणी जलदगती पॉक्सो न्यायालयाने मुलीच्या पित्याला 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा तसेच समाजात काळीमा फासणारा आहे, असे निरीक्षण न्यायालयाने केले आहे.
न्यायालयाने त्याला बलात्काराच्या गुन्ह्यासाठी 10 वर्षे कैद व आणि 50,000 रुपये दंड, अपंग मुलीवर अनेक वेळा बलात्कार केल्याबद्दल न्यायालयाने त्याला पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आणि 25,000 रुपये दंड तसेच अपंग व्यक्तींया हक्क?सरकारी वकील ए. मेंडोन्झा यांनी न्यायालयाला सांगितले की आरोपीने स्वतःच्या मुलीवर गुन्हे केल्याबद्दल त्याला कोणतीही दया दाखवू नये अशी विनंती न्यायालयाला केली होती. न्यायालाने शिक्षा म्हटले की, गुन्ह्याच्या वेळी आरोपी 46 वर्षांचा होता आणि त्याने केलेल्या गुन्ह्याचे परिणाम जाणून घेण्याइतपत प्रौढ होता. यापूर्वीही त्याला शिक्षा झाली आहे, त्याच्याविरुद्धचा गुन्हा हा स्वतःच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आहे. त्यामुळे त्याला त्याची शिक्षा ही मिळायलाच हवी असे न्यायालयाने म्हटले आहे.
मुलीची आई व तिचा पती (आरोपी) यांच्यात नेहमीच भांडणे होत होती. आरोपी नेहमी मद्यप्राशन करून येत असे व पत्नीशी वारंवार भांडण करत असल्याने त्याला कंटाळून ती कामानिमित्त मुलांना त्याच्याकडे ठेवून परदेशी गेली होती. आरोपी हा अपंग मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचा व्हिडीओ शेजार्यांनी काढला व तो मुलीच्या आईला पाठवला होता. ती गोव्यात आली तेव्हा तिने मुलीशी याप्रकरणी विचारणा केली. वडील लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती आईला दिल्यावर पोलिसांत त्या व्हिडीओसह पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला व न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
कोठडीतील वेळ शिक्षेतून वजा
कायदा 2016 अंतर्गत पाच वर्षांची साधी कारावासाची शिक्षा आणि 10,000 रुपये दंड ठोठावला आहे. या सर्व शिक्षा एकाचवेळी भोगायच्या आहेत. त्याने 2 वर्षे आणि 4 महिने कोठडीत घालवलेला वेळ त्याच्या शिक्षेपासून वजा केला जाईल, असे निवाड्यात म्हटले आहे.