Goa POCSO Case  Pudhari
गोवा

Goa POCSO Case | गोव्यात नराधम वडिलांचे संतापजनक कृत्य! 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी बापाला अटक

Goa POCSO Case | स्वतःच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून साळगाव पोलिसांनी तिच्या वडिलांना अटक केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
स्वतःच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून साळगाव पोलिसांनी तिच्या वडिलांना अटक केली आहे. दरम्यान, मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून कळंगुट पोलिसांनी दिवेंदू मोंडल (३१, रा. पश्चिम बंगाल) याला अटक केली आहे.

पीडित मुलीची पोलिसांनी मुंबईतून सुटका केली होती. सोमवारी मुंबईतून सुटका केल्यानंतर पीडित मुलीची बांबोळी येथील गोमेकॉमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अहवालात लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कळंगुट पोलिसांनी अपहरणप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६५ तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४, ६ आणि ८ अन्वये गुन्हा नोंदविला. दिवेंदूला मंगळवारी अटक करण्यात आली.

पीडित मुलगी २९ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजता शाळेतून बेपत्ता झाली होती. कळंगुट पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरू केला. तपासादरम्यान ती पश्चिम बंगालमधील दिवेंदूच्या सतत संपर्कात असून त्याच्यासोबत असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांचा माग काढत मुंबई गाठली.

स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोघांना ताब्यात घेऊन गोव्यात आणण्यात आले. त्यावेळी दिवेंदूला भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली होती. मंगळवारी सकाळी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

दिवेंदू हा सांगोल्डा येथील एका गाळ्यावर हेल्पर म्हणून काम करत होता. याच काळात तो पीडित मुलीच्या संपर्कात आला आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फूस लावून पळवून नेल्याचा आरोप आहे. दरम्यान, वैद्यकीय तपासणीनंतर पीडित मुलीने पीडित सहाय्य कक्षासमोर दिलेल्या जबाबात तिच्या वडिलांकडूनही लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT