Document  Pudhari
गोवा

Fake Document | बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक; गुन्हा दाखल

Fake Document | बनावट कागदपत्रे तयार करून सरकारी यंत्रणेची व तक्रारदार महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी आगशी पोलिसांनी भीमा दुला शिरोडकर याच्याविरोधात बीएनएस कलम ३१८(३) व ३३६(३) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
बनावट कागदपत्रे तयार करून सरकारी यंत्रणेची व तक्रारदार महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी आगशी पोलिसांनी भीमा दुला शिरोडकर याच्याविरोधात बीएनएस कलम ३१८(३) व ३३६(३) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट २०१७ ते २२ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत कुरका-तळावली ग्रामपंचायत हद्दीत आरोपीने खोटी माहिती देऊन बनावट कागदपत्रे तयार केली. ती ग्रामपंचायतीसमोर सादर केली. या कागदपत्रांच्या आधारे तक्रारदार महिला व तिच्या सासऱ्याच्या नावाने दोन विचलन प्रमाणपत्रे (डायव्हर्जन सर्टिफिकेट) मिळवल्याचा आरोप आहे.

त्यानंतर या बनावट प्रमाणपत्रांचा वापर करून तक्रारदार महिलेच्या पतीचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकारे सरकारी प्राधिकरणाची व तक्रारदाराची फसवणूक करून बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ऋषिकेश रायकर करीत असून, संशयिताला नोटीस बजावण्याची कारवाई सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT