पणजी : संगणक सेवा प्रदाता अशी ओळख पुढे करून बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांची फसवणूक करणार्या 5 जणांना कळंगुट पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पाचही जण पश्चिम बंगालमधील आहेत.
हे संशयित आरोपी वेगवेगळे अॅप वापरून संगणक सेवा देण्याच्या बहाण्याने विविध प्रकारच्या गिफ्ट कार्डद्वारे विदेशी नागरिकांना सेवा शुल्क भरण्यास प्रवृत्त करायचे आणि मग त्यांची फसवणूक करून रक्कम काढून घ्यायचे. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच कळंगुट पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना अटक करून बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त केले.
या प्रकरणी पोलिसांनी अभिषेक हरिराम पुरी (वय 27, गिरीशगढ रोड, हावडा, पश्चिम बंगाल), मोहम्मद फरीद मुलगा मोहम्मद हबिबुल्ला (28 वय, तोपसिया रोड, दक्षिण कोलकाता,पश्चिम बंगाल), अमीर अब्दुल गफूर आलम (38 वर्षे, तोपसिया रोड, दक्षिण कोलकाता पश्चिम बेनागल), गुड्डू रमेश शॉ (29 वर्षे, पितामदार सरकार लेन, कोलकाता,पश्चिम बंगाल) व अजोयगीर उमेश गिरी, (19 वर्षे, 147 गिरीश गोर रोड, कांगोली मॉल, पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना गुरुवारी रात्री 11.22 वा. अटक करण्यात आली.