'अमेझिंग गोवा'त महिला सक्षमीकरणावर भर Pudhari Photo
गोवा

Goa News : 'अमेझिंग गोवा'त महिला सक्षमीकरणावर भर

सरकारचे विशेष प्रयत्न सुरू; सुलक्षणा सावंत यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

पणजी : व्हायब्रेट गोवा फाऊं डेशन आयोजित अमेझिंग गोवा जागतिक व्यवसाय परिषद २०२४ मध्ये राज्यातील महिलांच्या सशक्तीकरणाचे दर्शन घडणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या वतीने विशेष प्रयत्न सुरू आहेत. पद्मिनी फाऊंडेशनच्या प्रमुख सुलक्षणा सावंत यांनी व्हायब्रेट गोवा फाऊंडेशनचे सुप्रसिद्ध मार्गदर्शक डॉ. जगत शहा यांना स्वयंसाह्य गट सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले.यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, महिलांना त्यांचे पॅकेजिंग वाढवण्यासाठी, त्यांच्या व्यवसायात वाढ करण्यासाठी आणि स्वयंपूर्ण ई बाजार सारख्या ई-वाणिज्य व्यासपीठाद्वारे शोध घेण्यासाठी प्रोत्साहित केले. डॉ. शहा यांनी, आगामी शिखर परिषदेत संधींचा लाभ घेण्याबाबत मौल्यवान अंतर्दृष्टी सामायिक केली.

शाश्वत पद्धतींवर भर दिला आणि सहभागींना ही तत्त्वे त्यांच्या उपक्रमांमध्ये राबविण्यासाठी प्रोत्साहित केले. गोव्यातील आर्थिक वाढ आणि सहकार्याला चालना देण्यासाठी रचना केलेले प्रदर्शन, कार्यशाळा आणि नेटवर्किंग सत्रांच्या विविध श्रेणींचे आश्वासन शिखर परिषदेत दिले आहे.

८ ते १० नोव्हेंबर दरम्यान शिखर परिषद

या उपक्रमाला व्हायब्रेट गोवा फाऊंडेशनचे अध्यक्ष अरमान बंक्ले आणि फाउंडेशनचे विश्वस्त गौतम खरंगटे यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांनी श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर ८ ते १० नोव्हेंबर २०२४ दरम्यान ही शिखर परिषद होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT