गोव्यात नायजेरियन विद्यार्थ्याकडे आढळले ड्रग्ज Pudhari File Photo
गोवा

गोव्यात नायजेरियन विद्यार्थ्याकडे आढळले ड्रग्ज

करण शिंदे

पणजी : गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने नायजेरियन येथील ‘इनोसंट’ विद्यार्थ्याला बुधवारी (दि.2) पहाटे 4.6 लाखांचे कोकेन आणि एक्स्टेसी पावडर बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. ही कारवाई शिवोली येथे करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे इनोसंट न्झेडिग्वे (वय23, रा. नायजेरियन) असे त्याचे नाव असून मागील काही दिवसांपासून तो पोलिस गुप्तचरांच्या रडारवर होता. तो शिवोली पुलाजवळ अमलीपदार्थ देण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. यामध्ये त्याच्याकडून 40 ग्रॅम कोकेन आणि 6 ग्रॅम एक्स्टेसी पावडर जप्त करण्यात आली.

वर्षभरापूर्वी भारतात एन्ट्री

प्राप्त माहितीनुसार, संशयित एका वर्षापूर्वी विद्यार्थी व्हिसावर तो भारतात आला होता. त्याने राजस्थानमधील अजमेर येथील विद्यापीठात बीबीएसाठी प्रवेश घेतला होता. त्याच्याकडे वैध पासपोर्ट आणि व्हिसा असून राहत असलेल्या ठिकाणची सर्व कागदपत्रे जसे की पोलिस पडताळणी, सी-फॉर्म वैध असल्याचे तपासात आढळले. सदर छापा पोलीस निरीक्षक साजीथ पिल्लई यांच्या देखरेखीखाली महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियंका गारोडी, कॉन्स्टेबल सदानंद मळीक, अक्षय नाईक, अमित साळुंके, विशाल शितोळे, योगेश मडगावकर, कुंदन पाटेकर यांच्या पथकाने टाकला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT