पणजी : गिरी अग्निवाडा येथे भाड्याच्या खोलीत राहणार्या महिला ड्रग्ज पेडलरला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. तिच्याकडून 6 लाख 80 हजार रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. आशा अजय लाक्रा (वय 40, मूळ रा. छत्तीसगढ) असे या महिलेचे नाव आहे.
गुन्हे शाखेने गुरुवारी (दि. 19) अग्निवाडा-गिरी येथे गुन्हे शाखेच्या पथकाने भाड्याच्या खोलीत राहणार्या महिलेची चौकशी केली. यावेळी तपासणीदरम्यान भाडेकरू आशा लाक्रा हिच्या पर्समधून पोलिस अधिकार्यांनी एमडीएमए आणि एक्टसीच्या तब्बल 268 गोळ्या जप्त केल्या. या गोळ्यांचे वजन 118.537 ग्रॅम आहे. आंतरराष्ट्रीय बाजार भावानुसार या अमलीपदार्थाची अंदाजे किंमत 6.8 लाख रुपये आहे. याप्रकरणी, अमलीपदार्थ विरोधी कायद्यांतर्गत येणार्या कलमान्वये आशा लाक्राहिला अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक लक्षी अमोणकर, पोलिस उपनिरीक्षक गिरीश पाडलोसकर, स्नेहा जवेर, इर्शाद वाटँगी, नवीन पालयेकर, कल्पेश शिरोडकर, महाबळेश्वर सावंत, अनिश तारी, कमलेश धारगळकर, रोशनी शिरोडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास लक्षी अमोणकर करत आहेत.