BJP Goa Incharge Bharti Pawar 
गोवा

BJP Goa Incharge Bharti Pawar | भाजपचा मोठा निर्णय! गोव्याच्या प्रभारीपदी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांची नियुक्ती

BJP Goa Incharge Bharti Pawar | भारतीय जनता पक्षाच्या गोवा प्रभारी म्हणून माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

भारतीय जनता पक्षाच्या गोवा प्रभारी म्हणून माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहप्रभारी म्हणून केरळ येथील भाजपचे नेते अनिल एंटोनी यांची नियुक्ती केली आहे. डॉ. भारती पवार या महाराष्ट्रातील खासदार असून त्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांच्याकडे गोवा भाजपचे प्रभारी पद सोपवण्यात आले आहे.

काँग्रेसचे माजी नेते व माजी केंद्रीय संरक्षण मंत्री ए. के. एंटोनी यांचे पुत्र व गेली काही वर्षे भाजपात असलेले अनिल एंटोनी यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. गोवा विधानसभेची निवडणूक पुढील सहा महिन्यांमध्ये होणार आहे.
या पार्श्वभूमीवर गोव्याजवळच्या महाराष्ट्रातील भाजप नेत्या डॉ. भारती पवार यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने त्याचबरोबर अल्पसंख्याक असलेले आणि अनिल एंटोनी यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती केल्यामुळे भाजपसाठी गोव्यातील निवडणुकीत त्यांचा फायदा होऊ शकतो. दरम्यान, खासदार सदानंद शेत तानावडे यांची महाराष्ट्राचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल तानावडे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT