पणजी : वीज खात्याचे कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांनी आणखी एका डिजिटल नेटवर्क कंपनीविरोधात कारवाईचा बडगा उभारला आहे. शेट्ये यांनी पाटो पणजी येथील मे. डिजिटल नेटवर्क असोसिएटेड प्रा. लि. या इंटरनेट आणि केबल सेवा पुरवठादार असलेल्या कंपनीचे संचालक नंदकुमार राजाराम मोहिते यांच्याविरोधात पणजी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
यावरून पोलिसांनी नंदकुमार मोहिते यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित कंपनीचे एजंट आणि कर्मचाऱ्यांनी वीज विभागाच्या खांबांवर आणि इतर पायाभूत सुविधांवर गुन्हेगारी स्वरूपाचे अतिक्रमण केले. त्यामुळे शेट्ये यांनी पोलिसांत तक्रार दिली. यासंदर्भात मोहिते यांना नोटीस बजावण्यात आली आहे.