Dengue outbreak risk | ‘अल निनो’मुळे आता ‘डेंग्यू’च्या डंखांचाही ताप वाढणार! File Photo
गोवा

Ponda Dengue Death | फोंड्यात डेंग्यूने महिलेचा मृत्यू

Ponda Dengue Death | फोंड्यात डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एका महिलेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

फोंडा : पुढारी वृत्तसेवा

फोंड्यात डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एका महिलेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मूळ उत्तर प्रदेश येथील आणि सध्या खडपाबांध-फोंडा येथे वास्तव्यास असलेल्या विभा तिवारी या विवाहित महिलेचे उपचारादरम्यान निधन झाले.

माहितीनुसार, विभा तिवारी यांना २२ मे रोजी ताप आल्याने फोंडा आयडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाही त्यांच्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या सातत्याने कमी होत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले.

तेथे २४ मे रोजी त्यांचे निधन झाले. दरम्यान, फौंडा परिसरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून आतापर्यंत दहाहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. खडपाबांध, बेतोडा, दुर्गाभाट, कुर्ती तसेच इतर भागांतील रुग्णांचा त्यात समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर, नगरसेवक विश्वनाथ दळवी, शौनक बोरकर आणि विद्या पुनाळेकर यांनी फोंडा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने फॉगिंग मोहीम राबविणे तसेच इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे अमलात आणण्याची मागणी त्यांनी केली.

सध्या फोंड्यातील विविध भागांमध्ये फॉगिंग आणि डास नियंत्रणाच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून नागरिकांनीही परिसर स्वच्छ ठेवून साचलेले पाणी नष्ट करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT