पणजी : पणजी येथील पिंटो गार्डन आणि बेकरीजवळ असलेले एक जुने घर कोसळले होते. बर्याच दिवसांनंतर त्या घराचे अवशेष हटविल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
पणजी स्मार्ट सिटी म्हणून विकास होत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या या पडक्या घरातचे अवशेष न्यायालयात प्रकरण असल्यामुळे हटवता येत नव्हते. त्यामुळे ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पडलेले हे घर प्लास्टिकने झाकण्यात आले होते.
प्लास्टिक अनेक ठिकाणी फाटलेले होते, त्यामुळे ते विद्रूप दिसत होते. पणजीत येणार्या लाखो पर्यटकांचे लक्ष या पडक्या घराकडे जात होते. काहीजण सुंदर गोव्याच्या राजधानीतील हे ठिकाण कॅमेर्यात कैद करत होते.
दरम्यान, हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे महापालिकेला इच्छा असूनही घराचा ढिगारा हटवता येत नव्हता; पण शेवटी न्यायालयाने शहरातील हे घर हटवण्याचे आदेश दिले आणि लगेच ती जागा मोकळी झाली. त्यामुळे पणजी महापालिकेसह नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.