तीन वाहनांमध्ये अपघात; डिलिव्हरी बॉय जखमी  pudhari photo
गोवा

तीन वाहनांमध्ये अपघात; डिलिव्हरी बॉय जखमी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : जुने गोवा येथील कदंब पठारावर पाण्याचा टँकर, कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीवरील डिलिव्हरी बॉय गंभीर जखमी झाला.

संबंधित तरुण खाद्यपदार्थाची डिलिव्हरी करण्यासाठी जात होता. समोरून येणाऱ्या कार आणि पाण्याच्या टँकरची चालता चालता धडक लागली आणि या विचित्र अपघातात दुचाकीही धडकली. यात तरुण जखमी झाला. त्या तरुणाबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

त्याला १०८ रुग्णवाहिकेतून गोवा बांबोळी येथील इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT