पणजी : ग्रामपंचायत निवडणूक ही स्थानिक पातळीवर लढवली जाते. त्यामुळे गावात असलेल्या आपल्या ओळखीच्या लोकांची आणि नातलगांची मते निश्चितपणे मिळतील अशी खात्री उमेदवारांना असते. मात्र रविवारी (दि.8) डिसेंबर रोजी बार्देश तालुक्यातील नादोडा पंचायतीच्या प्रभाग 5 या ईतर मागासवर्गीय (ओबीसी) राखीव प्रभागासाठी झालेल्या निवडणूकीत कुंदन बुधाजी कळंगुटकर या उमेदवाराला फक्त दोन मते मिळाली. या प्राप्त झाल्यामुळे मतांमुळे गावातच नव्हे तर बार्देश तालुक्यात तो एक चर्चेचा विषय बणला आहे.
राज्य निवडणूक आयोग अल्तीन्हो पणजी गोवा यांनी दिलेल्या माहितीनुसार मतदान प्रक्रिया झाल्यानंतर (दि.9) रोजी मामलेदार कार्यालय म्हापसा येथे मतमोजणी झाली. हा प्रभाग 5 ओबीसी साठी राखीव होता. पोटनिवडणुकीत या प्रभागातून प्रसाद नारायण नादोडकर यांना 207 मते मिळाली व ते विजयी झाले. तर राजेंद्र पांडुरंग मांद्रेकर यांना 54 मते प्राप्त झाली. तिसरे उमेदवार कुंदन बुधाजी कळंगुटकर यांना फक्त 2 मध्ये प्राप्त झाली आहेत. त्यामुळे एखाद्या उमेदवाराला फक्त दोनच मते मिळणे किंवा शून्य मते मिळणे हे आश्चर्य असून कळंगुटकर यांना त्यांच्या घरातील मतेही मिळाली नसल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.