उसगाव येथे घराजवळ असलेल्या नाल्यात बुडून दोन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.2) घडली. मृत मुलाचे कुटुंब मूळ झारखंड येथील असून येथील कुळगारात त्याचे आई-वडील काम करतात. या अपघाताची घटना समजताच फोंडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.
फोंडा येथे भाड्याच्या खोलीत राहणार्या झारखंड येथील कुटुंबातील दोन वर्षीय मुलगा खेळत होता. आई मोबाईलवर बोलत असताना नजर चुकवून जवळच असलेल्या नाल्याजवळ गेला आणि त्यात तो पडला. आवाज ऐकून घरातील मंडळींनी नाल्याजवळ धाव घेतली. स्थानिकांनी त्याला नाल्यातून बाहेर काढत गंभीर अवस्थेत असलेल्या मुलाला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मुलाला मृत घोषित केले. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पंचनामा करण्यात आला.