Dayanand Mandrekar Goa BJP 
गोवा

Dayanand Mandrekar Goa BJP | पक्षातील छळवणुकीमुळेच राजीनामा; दयानंद मांद्रेकर यांचा थेट आरोप

Dayanand Mandrekar Goa BJP News | दयानंद मांद्रेकर यांनी टाकला राजकीय बॉम्बगोळा

पुढारी वृत्तसेवा

पणजी (पुढारी वृत्तसेवा):

गेल्या ४० वर्षांपासून मी भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत आहे. मात्र, पक्षातीलच काही लोकांकडून माझी सातत्याने छळवणूक सुरू आहे. एससी, ओबीसी वित्त आणि व्यवस्थापन महामंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करताना पक्षाच्याच लोकांनी माझ्या कामात अडथळे आणले. या त्रासाला कंटाळूनच मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, असा थेट आरोप माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी केला आहे.

रविवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपण अद्याप भाजपातच असून, पुढील राजकीय वाटचालीबाबत कोणताही विचार केलेला नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

दयानंद मांद्रेकर यांनी शनिवारी एससी, ओबीसी वित्त आणि व्यवस्थापन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर ते भाजप सोडून इतर पक्षातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना मांद्रेकर यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीवर बोट ठेवले आहे. दिवाळी सणानिमित्त कार्यकर्त्यांनी शिवोली मतदारसंघात माझे बॅनर लावले होते. मात्र, विराज चोडणकर यांच्या सांगण्यावरून काही जणांनी ते बॅनर हटवले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

काहीजण आत... तर काहींना बाहेरचा रस्ता...

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पक्षात पुन्हा प्रवेश देण्यात आला आहे. मग तुम्ही वरिष्ठ नेते असूनही पक्ष तुमच्याबाबत अशी वागणूक का देत आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर मांद्रेकर म्हणाले की, नेत्यांची हीच कार्यपद्धती आहे. ते काहींना आत घेतात आणि काहींना बाहेर ठेवतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT