Indian athletes win 7 medals at Dakar Youth Olympics 
गोवा

Indian athletes win 7 medals at Dakar Youth Olympics|डाकार यूथ ऑलिम्पिकमध्ये भारतीय युवा खेळाडूंचा डंका

तब्बल सात पदकांची कमाई; ३ रौप्यसह ४ कांस्य पदकांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

पणजी : सेनेगलची राजधानी डाकार येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठित 'डाकार युथ ऑलिम्पिक' स्पर्धेत भारतीय युवा खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत देशाचा तिरंगा उंच फडकावला. अवघ्या १७ खेळाडूंच्या छोट्या भारतीय पथकाने आपल्या कौशल्याच्या जोरावर आतापर्यंत तब्बल ७ पदकांची (३ रौप्य आणि ४ कांस्य) कमाई केली असून अजूनही अनेक पदकांची आस कायम आहे.

भारतीय खेळाडूंनी जलतरण, बॅडमिंटन, ज्युडो आणि कुस्ती अशा विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारांत चमक दाखवून भारताचे नाव जागतिक स्तरावर सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे.

पदक विजेते खेळाडू : जलतरण : धिनिधी देसिंगू हिने महिलांच्या १०० मीटर आणि २०० मीटर फ्री-स्टाइल प्रकारात अप्रतिम कामगिरी करत २ कांस्यपदके पटकावली. तर तीर्थंक पेगू याने पुरुषांच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात कांस्यपदक जिंकले.

बॅडमिंटन: तन्वी पत्री हिने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात झुंज देत रौप्यपदक आपल्या नावे केले. ज्युडो : खुशबू रजकभाई दरजादाने ६३ किलो वजनी गटात दमदार कामगिरी करत रौप्यपदक मिळवले.

बीच रेसलिंग : तानियाने ७५ किलो वजनी गटात विरोधी पैलवानांना मात देत रौप्यपदक पटकावले. कंबाइन वूशू: राजकुमारी चानू हिने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर कांस्यपदक मिळवण्यात यश संपादन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT