Illegal Construction Pudhari
गोवा

Dabolim Illegal Construction | गोव्यातील दाबोळी विमानतळ परिसरातील 18 दुकानांवर कारवाईची मागणी; नेमकं प्रकरण काय?

Dabolim Illegal Construction | प्रताप म्हार्दोळकर यांची मागणी : १८ दुकानांचा सर्वेक्षणात समावेश

पुढारी वृत्तसेवा

दाबोळी : पुढारी वृत्तसेवा

दाबोळी विमानतळ परिसरातील कथित बेकायदा बांधकामांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव आणि त्यांच्या भावाच्या मालकीची असल्याचा आरोप असलेल्या बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी माजी सरपंच प्रताप म्हार्दोळकर यांनी केली आहे.

२०१८ मध्ये सर्वेक्षण आणि पंचनामा होऊनही कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. बुधवारी चिखली पंचायतीजवळ आयोजित पत्रकार परिषदेत म्हार्दोळकर यांनी प्रशासनाच्या कारवाईतील कथित दुजाभावावर प्रश्न उपस्थित केले. २०१७ मध्ये अलेक्झांडर जे. मायकल यांचे बेकायदा बांधकाम आढळल्यानंतर महिनाभरात ते पाडण्यात आले.

मग अन्य बांधकामांवर कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी केला. भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत सरकारने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. २०१८ मधील सर्वेक्षण आणि पंचनाम्यात दाबोळी जंक्शनवरील यादव बंधूंच्या मालकीची असल्याचा आरोप असलेली १८ दुकाने आढळल्याचा दावा अलेक्झांडर यांनी केला.

या दुकानांचे कायमस्वरूपी बांधकामांत रूपांतर (छाया : शेखर कळंगुटकर) झाल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने याचिका निकाली काढताना जाणीवपूर्वक न्यायालयीन निर्देशांचे उल्लंघन सिद्ध झाले नसल्याचे निरीक्षण नोंदवले होते. मात्र, संबंधित तक्रारींची तपासणी करून आवश्यकतेनुसार कारवाईचे निर्देश दिले होते, असे ते म्हणाले.

कमलाप्रसाद यांनी फेटाळले आरोप...

चिखली पंचायतीचे सरपंच कमलाप्रसाद यादव कमलाप्रसाद यादव यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आपली राजकीय प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि आपले लक्ष विचलित करण्यासाठी असे आरोप केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे आरोप म्हणजे राजकीय स्टंट आहे. आरोप सिद्ध करण्याची क्षमता विरोधकांकडे असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT