Sex Scandal Case  
गोवा

Curchorem Sex Scandal Goa | सोहम नाईक तिसऱ्या प्रकरणात क्राईम ब्रँचच्या ताब्यात! तपासाचा वेग वाढला

Curchorem Sex Scandal Goa | कुडचडेतील कथित सेक्स स्कँडल प्रकरणातील संशयित सोहम सुशांत नाईक याला तिसऱ्या प्रकरणात चौकशीसाठी क्राईम ब्रँचने ताब्यात घेतले आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कुडचडेतील कथित सेक्स स्कँडल प्रकरणातील संशयित सोहम सुशांत नाईक याला तिसऱ्या प्रकरणात चौकशीसाठी क्राईम ब्रँचने ताब्यात घेतले आहे. त्याला उद्या १० एप्रिलला न्यायालयात उभे करून पोलिस कोठडी घेण्यात येणार आहे.

दुसऱ्या प्रकरणात बाल न्यायालयाने त्याची १४ दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. संशयित सोहम नाईक याच्याविरुद्ध आतापर्यंत लैंगिक शोषण प्रकरणीचे पाच गुन्हे नोंद झालेले आहेत. त्यापैकी दोन गुन्ह्यांत पोलिस निरीक्षक परेश नाईक व उपनिरीक्षक संध्या गुप्ता यांनी चौकशी केली.

या दोन्ही प्रकरणामध्ये चौकशीस पुरेसा वेळ मिळाल्याने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. या दोन्हीमध्ये पीडितांच्या जबान्या नोंदवण्यात आल्या आहेत. बाल न्यायालयात गुरुवारी संशयित सोहम नाईक याला दुसऱ्या प्रकरणात पोलिस कोठडी वाढवून घेण्यासाठी उभे केले होते. त्याला सहा दिवस पोलिस कोठडी न्यायालयाने दिली होती व ती आणखी वाढवून देण्यास न्यायालयाने नकार देत न्यायालयीन कोठडी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT