LPG Cylinder Price file photo
गोवा

Goa Ujjwala Yojana | 'उज्ज्वला'च्या अर्जांसाठी पंचायती, आमदार कार्यालयांत नागरिकांची गर्दी

Goa Ujjwala Yojana | गोवा उज्ज्वला योजनेच्या अर्जांसाठी पंचायती अन् आमदार कार्यालयांत नागरिकांची तुफान गर्दी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा सरकारने जाहीर केलेल्या गोवा उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार असून, त्यासाठी तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. या योजनेचे अर्ज शनिवार, ५ सप्टेंबरपासून पंचायती तसेच आमदारांच्या कार्यालयांत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

अर्ज घेण्यासाठी तसेच ते भरून देण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असून, सोमवारी योजनेच्या तिसऱ्या दिवशीही ही गर्दी कायम होती.
नागरिकांना अर्ज सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी सरकारने रविवारी, ६ सप्टेंबर रोजी पंचायत कार्यालये खुली ठेवली होती. मोठ्या संख्येने नागरिकांनी अर्ज मिळविण्यासाठी आणि ते भरून देण्यासाठी गर्दी करताना दिसून आले.

अर्ज भरण्याबाबत संभ्रम

बहुतांश घरांमध्ये गॅस जोडणी पुरुषांच्या नावावर आहे. मात्र, अर्ज भरताना घरातील महिला गृहआधार योजनेचा लाभ घेत असल्यास किंवा कुटुंबातील कोणी दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभार्थी असल्यास त्यांच्या नावाने अर्ज भरावा लागतो, अशी माहिती काही ठिकाणी दिली जात आहे.

दरम्यान, काही ठिकाणी गॅस कनेक्शन ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, त्याच व्यक्तीच्या नावाने अर्ज भरावा, असे सांगितले जात आहे. तर काही ठिकाणी गृहआधार किंवा डीडीएसवाय योजनेच्या लाभार्थ्यांच्या नावाने अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT