डिचोली : डिचोलीतील काँग्रेसचे युवा नेते मनोज नाईक यांच्यावर शुक्रवारी रात्री अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
मनोज नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित हल्लेखोरांनी 'चड काँग्रेस जाय' असे म्हणत त्यांच्यावर मारहाणीचा प्रयत्न केला. या घटनेवेळी त्यांच्या सोबत एक नॅनो कारही असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी डिचोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते महेश म्हांबरे यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.