Youth Death Pudhari
गोवा

Goa News: 18 वर्षांचा धनुष अभ्यास दौऱ्यासाठी गोव्यात पोहोचला, उच्चमधुमेहामुळे गमावला जीव

म्हैसूर येथून गोवा अभ्यास दौर्‍यावर आलेला 40 जणांचा गट

पुढारी वृत्तसेवा

हणजूण : म्हैसूर येथून गोव्याचा अभ्यास दौर्‍यावर आलेल्या चाळीस जणांच्या गटातील धनुष कुमार (वय 18, मैसूर, कर्नाटक) या पॉलिटेक्निक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्याला उच्च मधुमेह होता. तो नियमित औषधे व इन्सुलिन घेत होता. त्या आजारामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

मैसूर कर्नाटकातील एका तंत्रविद्यानिकेतन महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मिळून 39 जणांचा गट अभ्यास दौर्‍यासाठी शुक्रवार, दि. 22 रोजी सायंकाळी हडफडे येथील एका रिसॉर्टमध्ये उतरला होता. हॉटेलवर पोहोचल्यानंतर काही वेळाने धनुष याला उलट्या होऊ लागल्या.लगेच त्याला हणजूण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचार केल्यावर त्याला पुन्हा रिसॉर्टवर नेण्यात आले. रात्री 10.30 वा. पुन्हा त्याला उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात तेथून गोमेकॉत पाठवण्यात आले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद

पोलिसांनी धनुषच्या मोठ्या भावाकडे चौकशी केली असता त्याने धनुषला उच्च मधुमेह असल्याचे सांगितले व तो नियमितपणे औषधे घेत असल्याचे सांगितले. या मृत्यूमागे कोणत्याही प्रकारचे संशयाचे कारण नसल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी नैसर्गिक मृत्यू म्हणून त्याची नोंद केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT