CM Dr. Pramod sawant 
गोवा

Colvale Jail Security | कोलवाळ कारागृह प्रकरण तापले! सुरक्षेसह खाद्यपदार्थ गैरप्रकाराच्या उच्चस्तरीय चौकशीचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आदेश

Colvale Jail Security | डीजीपी स्वतः करणार कोलवाळ जेलची पाहणी; मुख्यमंत्री सावंत यांनी मागवला सविस्तर अहवाल

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
कोलवाळ कारागृह सुरक्षाव्यवस्था तसेच कथित खाद्यपदार्थांच्या व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या दोन्ही प्रकरणांची चौकशीचे निर्देश पोलिस महासंचालकांना देऊन त्याच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

कारागृह परिसरात खाद्यपदार्थांचा कथित व्यवसाय सुरू असल्याच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, कोलवाळ कारागृह पोलिस विभागाच्या अखत्यारित आणल्यानंतर आम्ही त्यावर कडक नजर ठेवून आहोत. त्यामुळे कारागृहातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सुरक्षा आणि प्रशासनिक पातळीवर अधिक दक्षता घेतली जात असल्याचे संकेत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिले.


या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी थेट पोलिस महासंचालकांना (डीजीपी) पाहणी करण्यास सांगून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, असे सावंत यांनी सांगितले.
डीजीपींच्या पाहणीनंतर सादर होणाऱ्या अहवालातून कारागृहातील संबंधित व्यवस्थेबाबत नेमकी परिस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कारागृहातील शिस्त, सुरक्षा तसेच कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत व्यावसायिक हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून पुढील कारवाई केली जाऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT