मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत   Pudhari Photo
गोवा

CM Pramod Sawant | संविधान हातात घेऊन फिरल्याने लोकशाहीचे रक्षण होत नाही; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

CM Pramod Sawant | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : समाजाच्या विकासात विरोधकांची भूमिका महत्त्वाची

पुढारी वृत्तसेवा

मडगाव (पुढारी वृत्तसेवा):

संविधान हातात घेऊन फिरल्याने लोकशाहीचे रक्षण होत नाही. लोकशाही व्यवस्थेतील चुका निर्भीडपणे मांडून संबंधितारा योग्य मार्गावर आणण्याचे काम केल्यास लोकशाही अधिक बळकट होऊ शकते. या प्रक्रियेत पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

मडगाव येथील रविंद्र भवनमध्ये राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी विरोधी पक्ष आणि पत्रकार यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले.

मुख्यमंत्री म्हणाले, लोकशाही टिकवण्यासाठी तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वाची असते. सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवणे आणि जनतेच्या हिताचे प्रश्न ठापणे मांडणे ही विरोधी पक्षांची जबाबदारी आहे.

लोकशाही कार्यरत राहणे आवश्यक

  • लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी केवळ संविधानाचा सन्मान करणे पुरेसे नसून, संविधानातील मूल्यांनुसार लोकशाही व्यवस्था कार्यरत राहणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यवस्थेतील चुका दाखवून देणारा आणि जनहिताला प्राधान्य देणारा पत्रकारितेचा दृष्टिकोन ठरतो.

  • सरकारच्या कामकाजातील त्रुटी दाखवून देणे, चुकीच्या निर्णयांवर टीका करणे आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे यामुळे लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होते. मात्र, अनेकदा विरोधी पक्ष आपली जबाबदारी विसरतात. अशा परिस्थितीत पत्रकार विविध विषयांवर परखडपणे लिहून सरकारचे तसेच लोकशाही व्यवस्थेचे लक्ष वेधतात. त्यामुळे पत्रकारच खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे पार पाडतात. लोकशाही शासन व्यवस्थेकडूनही अशीच निर्भीड आणि जबाबदार पत्रकारिता अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.

  • आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत पत्रकारांची भूमिका नेहमीच मार्गदर्शक राहिली आहे. पत्रकारांनी मांडलेले मुद्दे आणि केलेले मार्गदर्शन लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टीने मोलाचे असल्याचेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले.

SCROLL FOR NEXT