CM Dr. Pramod sawant 
गोवा

CM Pramod Sawant Ponda | राज्यात ई-लायब्ररी सुरू करणार

CM Pramod Sawant Ponda | मुख्यमंत्री डॉ. सावंत : फोंडा पालिकेच्या नूतन वाचनालयाचे लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

फोंडा : पुढारी वृत्तसेवा

वाचनालयांच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय परीक्षांत यश संपादन करावे. ज्येष्ठ नागरिकांची चांगली सोय व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्या अनुषंगाने ई लायब्ररी सुरू करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

फोंडा पालिकेच्या नूतनीकरण केलेल्या मार्केट संकुलातील वाचनालयाचे उद्घाटन सोमवारी केल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत बोलत होते. कला संस्कृती खात्याच्या सहकार्याने फोंडा पालिकेचे हे वाचनालय नूतनीकरण करण्यात आले आहे.

यावेळी राजीव गांधी कला मंदिराचे अध्यक्ष रितेश नाईक, नगराध्यक्ष विरेंद्र ढवळीकर, कला सचिव संतोष सुखदेव, कला संस्कृती संचालक विवेक नाईक उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त व्हावे, यासाठी वाचनालये नूतनीकृत करण्यात येत आहेत.

या वाचनालयांचा लाभ घ्या आणि जीवनात मोठे व्हा. फोंडा पालिकेची विविध विकासकामे मार्गी लागली असून फोंडावासीयांना जे चांगले ते देऊ असे मुख्यमंत्री म्हणाले. नगराध्यक्ष विरेंद्र ढवळीकर म्हणाले,

फोंडा पालिकेचा विकास दिवंगत आमदार रवी नाईक यांनी केला असून आता उर्वरित कामे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात येत आहेत. फोंड्याला मुख्यमंत्र्यांनी विकासाच्या दृष्टीने नेहमीच प्राधान्य दिले असल्याचे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT