पणजी : पुढारी वृत्तसेवा
बदलत्या प्रभावी तंत्रज्ञानानुसारू कृत्रिम बुद्धिमत्ता, डीप टेक, स्पेस टेक आणि डिजिटल नवकल्पना या केवळ भविष्यातील संकल्पना नसून त्या आजच्या काळाची गरज आहेत. जनरेशन झेड आणि जनरेशन अल्फा ही पिढी या परिवर्तनाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे. आपले राज्य शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दुवा अधिक बळकट करत आहे. स्टार्टअप्स, कौशल्यविकास आणि उद्योजकतेसाठी सक्षम परिसंस्था निर्माण करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. गोवा राज्य उच्च शिक्षण परिषद आणि उच्च शिक्षण संचालनालय यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे आयोजित कॉन्व्हर्ज ३.० च्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोस्टर स्पर्धा, क्रिएटिव्ह क्लस्टर या विषयावरील 'डिजिटलली डॉक्युमेंट अवर गोवन हेरिटेज अँड टेक १७: लघुपट कार्यक्रम' या श्रेणीतील यंग इनोव्हेटर चॅलेंजच्या विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. यंदाच्या समिटची संकल्पना 'नवोपक्रम, एकात्मिकता, परिणामः गोव्याच्या भविष्यासाठी तयार असलेल्या बदल घडवणाऱ्यांची निर्मिती' अशी असून, कौशल्याला वास्तवातील संधींशी जोडून विद्यार्थी, उद्योग क्षेत्रातील मान्यवर, नवोन्मेषक आणि शिक्षणतज्ज्ञ यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यावर भर देण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील ५० महाविद्यालयांतील यावेळी उच्च शिक्षण संचालनालय आणि डीटीई संचालक भूषण सावईकर, उद्योजकता शिक्षण, उद्योजकता विकास विभागाचे संचालक डॉ. सत्य रंजन आचार्य, कार्यक्रम संचालक कन्व्हर्जचे संयोजक डॉ. नियान मार्चन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
रोजगार निर्माते बना : मुख्यमंत्री
उच्च शिक्षण संचालनालयाला कॉन्व्हर्ज उपक्रमासाठी प्राप्त झालेला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार हा त्यांच्या दूरदृष्टीचा सन्मान आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत असलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ नोकरी शोधणारे नव्हे, तर रोजगार निमति बनण्याची प्रेरणा मिळत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
नवकल्पनांना चालना देण्याची संधी
अशा उपक्रमांमुळे हॅकाथॉन, बूटकॅम्प, उद्योग सहकार्य आणि स्टार्टअप मार्गदर्शन यांसारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना नवकल्पनांना चालना देण्याची संधी उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सकारात्मक प्रतिसाद पाहता गोव्याचे भविष्य सक्षम आणि आत्मनिर्भर दिशेने वाटचाल करत असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.