Birsa Munda Jayanti Goa 
गोवा

Birsa Munda Jayanti Goa | देव, धर्म, देश संवर्धनासाठी कटिबद्ध व्हा!

Birsa Munda Jayanti Goa | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : भगवान बिरसा मुंडा यांचा जयंती उत्सव उत्साहात

पुढारी वृत्तसेवा

चावडी (पुढारी वृत्तसेवा):

देव, धर्म आणि देश संवर्धनाकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. भगवान बिरसा मुंडा यांनी जल, जमीन व जंगल संवर्धनाकरिता लढा दिला होता. आम्हीसुद्धा भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याची प्रेरणा घ्यायला हवी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काणकोण येथे केले.

काणकोण येथे आदिवासी कल्याण संचालनालयाच्या सहकार्याने भगवान बिरसा मुंडा यांचा १५१ वा जयंती उत्सव वेगवेगळ्या चार रंगमंचावर आयोजित केला होता. मल्लिकार्जुन देवालयाच्या मुख्य रंगमंचावरून मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर सभापती डॉ. गणेश गावकर, कला व संस्कृती तथा आदिवासी कल्याण मंत्री डॉ. रमेश तवडकर, गोवा प्रभारी डॉ. भारती पवार, भाजपचे प्रदेश सचिव सर्वानंद भगत, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, प्रभाकर गावकर, धाकूमडकईकर, सरपंच सविता तवडकर, पैंगीण जिल्हा पंचायत सदस्य अजय लोलयेकर व इतर उपस्थित होते.

गोव्यातील भाजपा सरकार संस्कृतीचे जतन करण्यासाठी कटिबद्ध आहे, याचा पुनरुच्चार केला. पंढरपूरला जाणाऱ्या वाऱ्याना कला व संस्कृती संचालनायातर्फे छोटीशी मदत केली होती. यापुढेही संस्कृतीचे रक्षण करण्याकरिता गोव्यातील भाजपा सरकार आर्थिक मदत देत राहील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

दीपप्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी गोव्यातील संपूर्ण वाऱ्यांचे रिंगण सुरू झाले. त्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सहभागी झाले. त्यांनी तंबोरा व चिपळी वाजवीत रिंगणात पंढरपाचा अभंगाचा ठेका धरला. त्यानंतर मुख्यमंत्री गायतोंडे मैदानावरील व्यासपीठावर गेले. तेथेतील कलाकारों यांनी सादर केलेल्या जम्मू-कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत विविध लोककला प्रकारांचा आनंद लुटला.

३० वाऱ्या एकाच ठिकाणी एकत्र

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्याच्या विविध भागांतून ज्या ३६ वाऱ्या पंढरपूरला जायच्या. त्यांची कदाचित रस्त्यावर एकमेकांशी भेट व्हायची. आज गोव्यातील सुमारे ३० वाऱ्या एकाच ठिकाणी एकत्र आल्या आहेत, ते पाहून सुख व आनंद झाला आहे. आमोणे येथे बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलेले भाषण बलराम शिक्षण संस्थेच्या विद्यार्थी व उपस्थितांनी पाहिले.

यावेळी भाजपा प्रदेश अध्यक्ष दामू नाईक, मंत्री डॉ. रमेश तवडकर, सरपंच सविता तवडकर, श्रीकांत गावकर, माजी उपनगाध्यक्ष किशोर शेट व इतर व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला काणकोणचे आमदार तथा आदिवासी कल्याण मंत्री डॉ. रमेश तवडकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व डॉ. भारती पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT