नवी दिल्ली : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पर्तगाळ मठाचे अध्यक्ष उद्योगपती श्रीनिवास धेंपे व उपाध्यक्ष आर. आर. कामत उपस्थित होते. Pudhari File Photo
गोवा

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

जीएसटी मंडळाच्या बैठकीत सहभाग

पुढारी वृत्तसेवा

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्ली दौर्‍यात अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी मंडळाच्या बैठकीत सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांना ‘टेम्पल्स ऑफ गोवा - अ स्पिरिच्युअल ओडिसी’ या पुस्तकाची प्रत भेट दिली. मूळतः मंगळुरू येथील वर्ल्ड कोकणी सेंटरने प्रकाशित केलेले हे पुस्तक गोवा सरकारने पुनर्मुद्रित केले आहे. गोव्याच्या समृद्ध आध्यात्मिक वारशावर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, राज्यातील अनेक मंदिरे वसाहतवादी राजवटीत पुनर्बांधणी किंवा स्थलांतरित करण्यात आली होती. ती मंदिरे लोकांच्या अढळ श्रद्धेचे आणि लवचिकतेचे प्रतीक म्हणून अजूनही उभी आहेत. गोव्याच्या इतिहासातील या पवित्र स्थळांचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व उलगडून दाखवणारा हा अनोखा प्रवास या पुस्तकात मांडण्यात आला आहे. यावेळी पर्तगाळ मठाचे अध्यक्ष उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांनी पंतप्रधान मोदी यांना पर्तगाळ मठाच्या 550 व्या वर्धापन दिन सोहळ्याचे आमंत्रण दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT