उच्चदाबाची वीजवाहिनी टेम्पोवर पडल्याने क्लिनरचा होरपळून मृत्यू 
गोवा

Goa Accident : उच्चदाबाची वीजवाहिनी टेम्पोवर पडल्याने क्लिनरचा होरपळून मृत्यू

वेर्णा-बिर्ला वळणावरील दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

दाबोळी : वेर्णाहून तिसवाडी-बांबोळीच्या दिशेने जाणाऱ्या मिनी टेम्पोवर उच्चदाबाची वीजवाहिनी कोसळल्याने घडलेल्या थरकाप उडवणाऱ्या घटनेत क्लिनरचा होरपळून जागीच मृत्यू झाला. वेर्णा-बिर्ला मुख्य वळणाकडे शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली. या भीषण प्रसंगातून चालक थोडक्यात बचावला.

संबंधित टेम्पो वेर्णाहून बांबोळीच्या दिशेने जात होता. सिग्नल लागल्याने चालकाने वाहन थांबवले. त्यापूर्वी काही वेळ परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, अचानक वीजपुरवठा सुरू होताच उच्च दाबाची वाहिनी तुटून थेट टेम्पोवर पडली. क्षणार्धात वाहनात करंट पसरल्याने चालक मुबारक आणि क्लिनर अंकित यांनी जीव वाचवण्यासाठी घाईघाईने वाहनाबाहेर उडी घेतली. याचवेळी पळून जात असताना क्लिनर अंकित हा वीजवाहिनीत अडकला आणि प्रचंड उच्च दाबामुळे त्याला जोरदार शॉक बसून तो जागीच होरपळून मरण पावला.

चालक मुबारक (मूळ झारखंड) हा कसाबसा बचावला. या दुर्घटनेमुळे वेर्णा महामार्गावर सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. मृत अंकित हा मूळ छत्तीसगड येथील असल्याचे समजते. त्याचा मृतदेह द. गोवा जिल्हा इस्पितळात ठेवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT