पणजी : पुढारी वृत्तसेवा
चोडण - रायबंदर मार्गावरील रो रो फेरीबोटीतील एसी अनेकदा बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. या मार्गावरील गंगोत्री या रो रो फेरीबोटीतील एसीत आज, रविवारी बिघाड झाला होता.
भरदुपारी या फेरीबोटीतून प्रवास करणारे प्रवासी प्रवासी कक्षात (पॅक्स रूम) एसी असल्याने जाऊन बसले. मात्र, एसी सुरू नव्हता.कक्ष प्रवाशांनी पूर्ण भरला होता.त्यात लग्नसमारंभासाठी गेलेल्या महिलांचा मोठा भरणा होता.मात्र, एसी बंद असल्याने उकाडा असह्य झाला .त्यामुळे सगळे प्रवासी बाहेर येऊन थांबले.
याबाबत कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांना सकाळपासून एसीत बिघाड झाल्याने बंद असल्याचे सांगितले.अर्थात ही काही पहिलीच वेळ नाही.अधूनमधून दोन्ही रो रो फेरीबोटीतील एसी अनेकदा बंद असतात. नदी परिवहन खात्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.