डिचोली : साखळी मतदारसंघातचा विकास साधतानाच बाये-सुर्ल परिसरात भाजप सरकारने विविध विकासकामे पूर्ण केली आहेत. कोणतीही अडचण असुद्या, बेधडक माझ्याकडे या, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मतदारांशी चर्चा करताना सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघात सातत्याने लोकांशी, कार्यकर्त्यांनी संपर्क वाढवला आहे. देशात नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारला 11 वर्षे पूर्ण झाल्याने साखळी मतदारसंघात 50 ही मतदान बूथवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनखाली बूथ चलो अभियान कार्यक्रम राबवण्यात येत असून बुधवारी बाये-सुर्ला बूथ क्र. 34 वर बूथ चलो अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बूथ क्र 34 च्या मतदारांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, सरपंच साहिमा गावडे, मंडळ अध्यक्ष रामा नाईक, मंगलदास उसगावकर, स्थानिक पंच दिनेश मडकईकर, बूथ अध्यक्ष सुदेश गावडे भाजप कार्यकर्ते व या बूथवरील मतदार उपस्थित होते. सूत्रसंचालन नीलेश नाईक यांनी केले.
‘सबका साथ सबका विकास’ या धर्तीवर सर्व मतदारांना मुख्यमंत्री भेटणार असून त्यांच्या समस्या ते जाणून घेणार आहेत. बुथ कार्यकर्ता हा पक्षाचा शिलेदार आहे. त्यामुळे या बूथ कार्यक्रमांत मोठ्या उत्साहात कार्यकर्ते हितचिंतक सहभागी होत घरोघरी या कार्यक्रमाविषयी माहिती देण्यात येणार आहे.
विविध योजना, नोकर्या याबाबत जास्तीत जास्त कामे या परिसरातील लोकांची झाली आहेत. तरीही या भागात आम्हाला हवी तशी साथ निवडणुकीत मिळत नाही, असे का होते, असा प्रश्न मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मतदारांकडे उपस्थित केला. यावेळी त्यांनी मतदारांच्या वैयक्तिक समस्या जाणून घेतल्या.