Old Women Pudhari
गोवा

Free Health Checkup | 40 वर्षांवरील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी

Free Health Checkup | डॉ. प्रमोद सावंत; 'चेक्ड बाय दोतोर'ची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

नये, या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. राज्यातील ४० वर्षांवरील सर्व महिलांसाठी चेक्ड बाय दोतोर ही विशेष प्रमोद सावंत यांनी दिली. ही आरोग्य मोहीम राबवण्यात मोहीम ३१ मार्चपर्यंत सुरू येणार आहे. याअंतर्गत असल्याचेही सरकारी रुग्णालयांमध्ये महिलांची संपूर्ण शरीर तपासणी मोफत केली जाणार आहे.

महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ही मोहीम ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांदरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महिला नेहमीच कुटुंबातील इतर सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेतात, मात्र असे करताना त्यांचे स्वतःच्या प्रकृतीकडे वारंवार दुर्लक्ष होते.

हीच बाब लक्षात घेऊन सरकारने राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, सामुदायिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय येथे ४० वर्षांवरील महिलांसाठी सर्व प्रकारच्या आरोग्य चाचण्या मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत.

या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ सरकारी रुग्णालयेच नव्हे, तर खासगी रुग्णालयांमध्येही सवलतीच्या दरात तपासणीची सोय करण्यात आली आहे.

राज्यातील प्रत्येक तालुक्यात किमान एका खासगी रुग्णालयाची निवड करण्यात आली असून, तिथे महिलांना अल्प दरात या चाचण्या करून घेता येतील. साधारणपणे या चाचण्यांसाठी खासगी ठिकाणी ८ ते १० हजार रुपये खर्च येतो, परंतु या मोहिमेअंतर्गत महिलांना अत्यंत कमी शुल्कात ही सुविधा मिळणार आहे. मणिपालसारख्या नामांकित खासगी रुग्णालयांनीही या मोहिमेत सहभाग दर्शवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT