Traffic Wardens Pudhari
गोवा

Panaji Traffic Problem | सलग सुट्ट्यांमुळे गोव्यात पर्यटकांचा पूर; कॅसिनोंमुळे पणजीत प्रचंड वाहतूक कोंडी!

Panaji Traffic Problem | सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांचा पूर ; बांदोडकर मार्गावर बेशिस्त पार्किंग

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सलग सुट्ट्यांमुळे राजधानी पणजीत आलेल्या पर्यटकांचा जणू कॅसिनोवर पूरच आला होता. पर्यटकांच्या वाहनांमुळे डी. बी. बांदोडकर मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. दुसरीकडे राज्यातील सर्व समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले होते.

महात्मा गांधी जयंतीला शनिवार, रविवार जोडून आल्याने महाराष्ट्र, कर्नाटक व इतर राज्यांतून देशी पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात आले होते. यातील अनेक पर्यटक कॅसिनोमध्ये खेळण्यासाठी किंवा कॅसिनोचे जग पाहण्यासाठी मांडवी नदीतील कॅसिनोमध्ये धाव घेतात.

कॅसिनोत जाण्यासाठी डी. बी. बांदोडकर मार्गाला लागून त्यांची कार्यालये आहेत. त्यासमोर सगळ्या कार थांबतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. सलग सुट्टी असल्याने वाहनांची व पर्यटकांची गर्दी मोठी पाहायला मिळाली. समुद्रकिनारेही पर्यटकांच्या गर्दीने फुलले होते. शाळांना सुट्ट्या असल्याने लहान मुलांचीही मोठी गर्दी होती. राज्यातील रस्ते, हॉटेल पर्यटकांच्या गर्दीने फुलले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT