गोवा

Ambulance Accident | खांडोळा येथे कार अन् रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर, चालक थोडक्यात बचावला!

Ambulance Car Accident | समोरासमोर जोरदार धडक! खांडोळा-देवळाय कॉलनी मार्गावर रुग्णवाहिका आणि कारचा अपघात.

पुढारी वृत्तसेवा

माशेल : पुढारी वृत्तसेवा
खांडोळा उच्च माध्यमिक ते देवळाय कॉलनी अंतर्गत रस्त्यादरम्यान सकाळी ७.१५ च्या दरम्यान कार गाडी (जी. ए. ०५. एफ. ४०५४) आणि रुग्णवाहिका (जी. ए. ०७. जी. २०२५) मध्ये समोरासमोर जोरदार टक्कर झाली व त्यात कारचा दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. कारचालक समित फडके थोडक्यात बचावला. धडक मोठी होती की, कार मागे सरकून गटाराबाहेर फेकली गेली.

सविस्तर माहितीप्रमाणे वाळपई सी. एस. सी. वैद्यकीय हॉस्पिटलातून रुग्णवाहिका एका रुग्णाला बांबोळीला उपचारासाठी घेऊन गेली होती. बांबोळीहून परत वाळपई येथे परत जात असताना तसेच कार खांडोळा उच्च माध्यमिकच्या दिशेने जाताना हा अपघात घडला. या मार्गाने वाहनांची सतत वर्दळ असल्याने १ तास वाहनांची कोंडी निर्माण झाली.

त्यामुळे शेकडो वाहन चालकांनी माशेलमार्गे वळसा घालून गवंडाळी पुलावरून पणजीला निघाले होते. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच माशेल पोलिस चौकीचे हवालदार गावस यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT