चावडी : पुढारी वृत्तसेवा
चुलीवर जेवण करताना गृहिणीला स्वयंपाक घरातील धुरामुळे विविध आजार होतात. चुलीत लाकडे वापरण्यासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होते, पर्यावरणाचा न्हास होतो, अशी विविध कारणे सांगून गॅसद्वारे जेवण करण्याचा देशभरात प्रसार सुरू झाला होता.
या प्रसारामुळे शहरात तसेच ग्रामीण भागातील लोकांनी चूल सोडली होती व हळूहळू सर्वांनाच स्वयंपाक गॅसवर शिजवण्याची सवय झाल्याने काही ग्रामीण भाग सोडल्यास इतरांनी चूल सोडली होती.
आता इराण- इस्राईल अमेरिका युद्धाची धग देशाच्या इतर भागांबरोबरच गोव्याच्या विविध तालुक्यांना पोहोचली असून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा होत नसल्याने आता काणकोणमधील हॉटेल व्यावसायिक आता पुन्हा
पुरवठा अधिकाऱ्यांकडून तपासणी
दरम्यान, शुक्रवारी नागरी पुरवठा खात्याचे सहायक संचालक उल्हास वेळीप यांनी कोणी हॉटेल व्यावसायिक घरगुती गॅस सिलिंडर हॉटेलमध्ये वापरत आहे काय, याची तपासणी केली. मात्र, त्यांना तसा कुणीच सापडला नसल्याचे त्यांनी सांगितले.
काहींना हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ
सध्या काणकोणमधील तर हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेलच्या खुल्या जागेत चूल घालून जेवण तयार करण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल्स बंद ठेवली आहेत.