गोवा

Canacona Adi Lokotsav | काणकोणचा आदी लोकोत्सव 11 डिसेंबरपासून : तवडकर

Canacona Adi Lokotsav | आदर्श युवा संघातर्फे तीन दिवस आयोजन; विविध स्पर्धा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
आदर्श युवक संघ व बलराम शैक्षणिक संस्था गाव डोंगरी खोतीगाव कानकोणतर्फे कला व संस्कृती खाते आणि आदिवासी संशोधन संस्था गोवा यांच्या सहकार्याने आयोजित आदी लोकोत्सव ११ डिसेंबर ते १३ डिसेंबर या काळामध्ये आदर्श ग्राम आमोणे येथे आयोजित केला आहे. याबाबतीची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष आणि कला व संस्कृती खात्याचे मंत्री डॉ. रमेश तवडकर यांनी दिली.

पणजी येथे सोमवारी पत्रकार परिषदेत मंत्री तवडकर बोलत होते. यावेळी आदर्श युवक संघाच्या सल्लागार आणि स्थानिक सरपंच तथा शिक्षिका सविता तवडकर, पदाधिकारी रूपेश तवडकर, दीपक वेळीप, गंगेश वेळीप, कविता नाईक गावकर व आदर्श युवक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत वेळीप उपस्थित होते.

मंत्री डॉ. तवडकर म्हणाले की, आदर्श युवक संघातर्फे आयोजित लोकोउत्सवाची कीर्ती देशभरात पोहोचली आहे त्यामुळे दरवर्षी देशभरातून दोन-ते अडीच लाख लोक या लोकोउत्सवाला भेट देतात. यंदाही तेवढ्यांच लोकांची अपेक्षा आहे.

ग्रामीण संस्कृती संरक्षण करतानाच त्या संस्कृतीचे प्रदर्शन नव्या पिढीसमोर व्हावे यासाठी या लोकोउत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. तीन दिवसांत विविध प्रकारच्या स्पर्धांच्या माध्यमातून गावच्या परंपरा व संस्कृतीचे रक्षण करण्याचा प्रयत्न या लोकोउत्सवातून करण्यात येतो. राज्यभरातील ४५० च्या आसपास महिला स्वयंसहाय्यता गटांना येथे त्यांनी तयार केलेले ग्रामीण खाद्यपदार्थांचे व इतर वस्तू विक्री करण्यासाठी स्टॉल घालण्याची संधी दिली जाते.

त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधे, कंदमुळे, आदिवासी लोकांचे खाद्यपदार्थ येथे उपलब्ध करण्यात येतील, असे तवडकर यांनी सांगितले. सविता तवडकर यांनी सांगितले की, लहान मुलापासून ते महाविद्यालयाच्या तरुणांपर्यंत विविध स्पर्धांचे आयोजन लोकोउत्सवात केले आहे. यामध्ये मुलासाठी वेशभूषा स्पर्धा, देशभक्ती गीत गायन स्पर्धा, नाट्यछटा, विज्ञान प्रयोग, रंगोली स्पर्धा, पथनाट्य आदी एकूण ४४ स्पर्धा होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT