गोवा

मगोपला गतवैभव प्राप्त होईल काय?

Can MGP regain its former glory?- 'एकला चलो रे'कडे वाटचाल : मगोच्या सर्वेक्षणांमुळे उत्सुकता

पुढारी वृत्तसेवा

पणजी : राज्याच्या राजकीय क्षितिजावर काँग्रेस-भाजपचा उदय होण्यापूर्वी मगो-युगोचे युग सुदिन ढवळीकर होते. गोव्याला घटक राज्य मिळण्यापूर्वी राज्याची मतदारसंख्या ३० होती. त्यातील २८ गोवा आणि दोन जागा दमण व दीवमध्ये होत्या. यात १८-१२ (मगो-युगो) चे गणित ठरलेले होते. आज मगोपच्या १८ पैकी बहुतांश जागा भाजपने घेतल्या आहेत तर युगोच्या १२ पैकी बहुतांश जागा काँग्रेसकडे आहेत. मात्र, राज्यात 'सिंह' चिन्ह म्हटले की अनेक जुने जाणते लोक आजही भावुक होतात.

म.गो.पक्ष बालेकिल्ला. २००२ साली अॅड. रमाकांत खलप यांचा पराभव करून या मतदारसंघात भाजपचे लक्ष्मीकांत पार्सेकर निवडून आल्यानंतर तो भाजप व काँग्रेसकडे राहिला. मात्र २०२२ च्या निवडणुकीत तब्बल २० वर्षांनंतर मगोपचे जीत आरोलकर या मतदारसंघात विजयी झाले. मतविभागणीचा लाभ जीतना झाला हे खरे असले तरी तिथे मगोची बऱ्यापैकी मते आजही आहेत हे नाकारता येत नाही. अशीच परिस्थिती अनेक मतदारसंघांत आहे.

मडकई हा मतदारसंघ मगोपने आपला बालेकिल्ला बनवला आहे. सुदिन ढवळीकर १९९९ पासून या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. प्रियोळ या मतदारसंघातही २००७ व २०१२ मध्ये दीपक ढवळीकर यांनी बाजी मारली होती. २०१२ मध्ये फॉड्यातून मगोच्या लवू मामलेदार यांनी रवी नाईक यांचा पराभव केला होता. २०१७ मध्ये पेडण्यातून मगोपचे बाबू आजगावकर तर सावर्डेत दीपक पाऊसकर निवडून आले होते. अलीकडेच वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी १३ मतदारसंघांत मगो पक्ष सर्वेक्षण करणार असल्याची घोषणा केली आहे, त्याला हीच पार्श्वभूमी असावी.

विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत मगोने जिंकलेले मतदारसंघ

पेडणे, मांद्रे, शिवोली, म्हापसा, थिवी, डिचोली, पाळी (आजचा साखळी), सांत इस्तेव्ह, मडकई, शिरोडा, सांगे, काणकोण, केपे. १९६३ ते १९८० पर्यंत हेच चित्र दिसायचे. १९८० साली यातील केवळ सात मतदारसंघ पक्षाकडे राहिले.

मगो पक्ष या मतदारसंघात करणार सर्वेक्षण

मडकई, फौंडा, शिरोडा, प्रियोळ, कुंभारजुवा, सावर्डे, काणकोण, पेडणे, मांद्रे, मये, डिचोली व साखळी. मडकई व मांद्रे मतदारसंघ सध्या पक्षाकडे आहे. साधारण मराठी पट्ट्यातील इतर मतदारसंघही नेहमी मगोपच्या बाजूने राहिलेले होते. आपण अधिक परिश्रम घेतल्यास हे मतदारसंघ जिंकण्याची आपल्याला संधी आहे असे मगोप नेतृत्वाला वाटते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT