पणजी : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी 24 पासून सुरू होत आहे. बुधवारी 26 रोजी मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री डॉ. प्रमोद सावंत राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात जनतेला नेमके काय हवे आहे, याचा आढावा घेतला असता, जनतेच्या हिताचा, राज्याच्या प्रगतीचा अर्थसंकल्प असावा, अशी अपेक्षा गोमंतकियांनी व्यक्त केली आहे.
कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद हवी गोवा हा कृषी प्रधान प्रदेश आहे. बदलता काळ आणि हवामानामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. एकेकाळी कृषीवरच राज्याची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून होती. काळ बदलला खाण व्यवसायाने ठाण मांडले आणि कृषीक्षेत्राकडे दुर्लक्ष होऊ लागले. कृषी क्षेत्र ओस पडू लागले आहे. सध्या पर्यटकावर अर्थव्यवस्था असली तरी राज्याला पुन्हा कृषिप्रधान करण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतुदी करण्याची आवश्यकता आहे.-नीलम वाघेला, गृहिणी, आल्त बेती पर्वरी