गोवा

Breast Cancer Vaccine: कॅन्सर दिनानिमित्त प्रारंभ; महिलेला प्रथमच ब्रेस्ट कॅन्सरवरील इंजेक्शन दिले

मोनिका क्षीरसागर

पणजी; पुढारी वृत्तसेवा: ब्रेस्ट कॅन्सरवर प्रभावी ठरणारे ४ लाख २० हजार रुपयांचे पहिले इंजेक्शन जागतिक कॅन्सर दिनानिमित्त रविवारी 4 फेब्रुवारी रोजी गोव्यातील महिलेला देण्यात आले. हे इंजेक्शन आजपासून बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) मोफत मिळणार आहे. अशा प्रकारचे महागडे इंजेक्शन मोफत देणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री राणे यांनी ही​ माहिती दिली आहे. (Breast Cancer Vaccine)

देशभरासह गोव्यातही​ ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यामुळेच आरोग्य खात्याने गेल्या काही वर्षांत एक लाखांपेक्षा अधिक महिलांची याबाबत तपासणी​ केलेली आहे. पुढील वर्षभरात आणखी दीड लाख महिलांची तपासणी करण्यात येणार आहे, असे राणे यांनी सां​गितले. देशभरातील गोरगरीब महिलांना आरोग्यासंदर्भात आधार आणि मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वि​विध योजना आखलेल्या आहेत. त्याचा लाभ लाखो महिला घेत आहेत. ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त असलेल्या गोव्यातील महिलांना अशा प्रकारची ख​र्चिक इंजेक्शन घेणे शक्य नाही. त्यामुळेच आरोग्य खात्याने त्यांना अशी इंजेक्शन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मंत्री राणे यांनी म्हणाले. (Breast Cancer Vaccine)

१६ महिन्यांत  कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी करणार

गोव्यातील स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी पुढील १६ महिन्यांत होणार आहे. याबाबत टाटा मेमोरियलशी करार करण्यात आला आहे. गोव्यातील कॅन्सरग्रस्तांना यापूर्वी उपचारांसाठी इतर राज्यांमध्ये जावे लागत होते. परंतु, हे इस्पितळ सुरु झाल्यानंतर त्यांना सर्व उपचार गोव्यातच मिळतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Breast Cancer Vaccine)

SCROLL FOR NEXT