Goa Romeo Lane Demolition 
गोवा

Luthra Brothers Bombay High Court | लुथरा बंधूंना प्रत्येकी 20 लाख जमा करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा प्रस्ताव

Luthra Brothers Bombay High Court | बर्च अग्निकांड प्रकरण : पीडित कुटुंबाना प्रत्येकी 50 लाखांची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
'बर्च बाय रोमियो लेन' अग्निकांड प्रकरणातील मृतांच्या कुटुंबांनी प्रत्येकी किमान ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई मागितल्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सोमवारी नाइट क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांना अंतरिम स्वरूपात प्रत्येकी २० लाख रुपये जमा करण्याचा प्रस्ताव दिला.

अंतिम नुकसानभरपाई किती असावी, यावर रकमेचा कोणताही परिणाम होणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. सर्व २५ मृतांच्या अवलंबितांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कायदेशीर मदत योजनेअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या अॅड. प्राची सावंत यांनी न्यायालयाला सांगितले की, लुथरा बंधूंनी मागील सुनावणीवेळी प्रत्येक मृताच्या कुटुंबाला १५ लाख रुपये देण्याची तयारी दर्शवल्यानंतर २० पैकी केवळ ९ कुटुंबांनी त्यांच्याशी संपर्क साधला.

ज्या कुटुंबांनी प्रतिक्रिया दिली, त्यांना अपुरी वाटत दिली, त्यांना जवळपास ५० लाख रुपये मिळायला हवेत, असे त्यांनी सांगितले, अशी माहिती सावंत यांनी खंडपीठाला दिली.
यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, २० लाख रुपयांची प्रस्तावित रक्कम ही केवळ अंतरिम व्यवस्था असेल. अंतिम नुकसानभरपाई ठरवताना या रकमेचा अंतिम निर्णयावर परिणाम होणार नाही आणि कायदेशीर प्रक्रिया सरू राहील.

पीडित कुटुंबांशी संवाद साधा:
प्रलंबित असलेल्या सर्व प्रकरणांची आणि त्यांच्या सद्यस्थितीची माहिती देणारा तक्ता पुढील बुधवारी सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच प्रत्येकी २० लाख रुपयांच्या अंतरिम ठेवीबाबत पीडित कुटुंबांची भूमिका जाणून घेण्यासही सांगितले. लुथरा बंधूपैकी एका भावाची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले. ६ डिसेंबर २०२५ रोजी 'बर्च बाय रोमियो लेन' नाइट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी २१ जण क्लबचे कर्मचारी होते.


बंधूंनी प्रत्येकी २० लाख रुपये जमा करावेत. अंतिम नुकसानभरपाई किती असेल, हे आम्हाला माहिती नाही. त्यावर व्याजही सुरू राहील, असे खंडपीठाने नमूद केले. कुटुंबांना त्यांच्या मागणीबाबत स्पष्टपणे सांगता येत नसल्याचे सावंत यांनी सांगितले. त्यावर त्यांनी पुन्हा एकदा कुटुंबांना प्रस्ताव समजून सांगावा, असे न्यायालयाने सूचित केले. दरम्यान, या आगीत एका कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला असून, त्या कुटुंबाने हरियाणा ग्राहक आयोगासमोर ग्राहक तक्रार दाखल केल्याची माहितीही सावंत यांनी न्यायालयाला दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT