पणजी : भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी. एल. संतोष गोव्यात दाखल झाले असून त्यांनी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी गुरुवारी रात्री उशिरा विविध विषयांवर चर्चा केली. शुक्रवारी ते मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री आणि आमदार यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळातील फेरबदल, कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी ’आदिवासी कल्याण’ खात्यासंदर्भात केलेले वक्तव्य, त्यानंतर उठलेला गदारोळ, पक्ष संघटन, ’संकल्प से सिद्धीतक’ अभियान अशा विविध मुद्द्यांची चर्चा सुरू आहे. केंद्रीय संघटन मंत्री संतोष प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने मंत्रिमंडळातील फेरबदल, मंत्री गावडे यांच्यावरील कारवाई या मुद्द्यांचा यात समावेश आहे.