पणजी : भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्ते व नेते यांनी पक्ष हिताला नोहमीच प्राधान्य दिले आहे. भाजपशिवाय पर्याय नाही, हे लोकांना पटले आहे. मुळे येत्या जिल्हा पंचायत, पालिका व 2027 मध्ये होणार्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवून देण्याचे आपले उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले.
दामू नाईक यांचा वाढदिवस शनिवारी विविध उपक्रमांसह साजरा करण्यात आला. सकाळी त्यांनी हरवळे येथील श्री रुद्रेश्वर देवस्थानामध्ये जाऊन महाभिषेक केला आणि पूजा केली, त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आमदारांच्या उपस्थितीत त्यांचा वाढदिवस देवस्थान सभागृहामध्ये साजरा करण्यात आला. भाजप कार्यालयात दाखल झाले. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री विश्वजित राणे, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार प्रवीण आर्लेकर, महापौर रोहित मोन्सेरात आदी नेत्यांनी नाईक यांना शुभेच्छा दिला.
51 टक्के मते हेच लक्ष
लोकसभा निवडणुकीत गोव्यात भाजपला 51 टक्के मते मिळाली होती. हीच मते विधानसभेमध्ये कायम ठेवून 27 पेक्षा जास्त जागा भाजपला मिळवण्याचे सर्वांच्या सहकार्याने आपले प्रयत्न असतील. भाजपने जिल्हा पंचायत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीला केवळ दीड वर्ष शिल्लक असल्याने विविध माध्यमातून जनतेपर्यंत विकासकामे घेऊन जाणार असल्याचे दामू म्हणाले.