भाजप प्रदेश सरचिटणीसपदी कुंकळ्येकर,भगत Pudhari File Photo
गोवा

Goa : भाजप प्रदेश सरचिटणीसपदी कुंकळ्येकर,भगत

भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; दाजी साळकर प्रवक्ते : सिद्धेश नाईक माध्यम प्रमुख

पुढारी वृत्तसेवा

पणजी : भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेश सरचिटणीस म्हणून पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर व सर्वानंद भगत यांची तर मुख्य प्रवक्ते म्हणून वास्कोचे आमदार दाजी साळकर यांची निवड करण्यात आली आहे. माध्यम प्रमुख म्हणून जि.पं. सदस्य सिद्धेश नाईक यांची निवड करण्यात आली आहे. खजिनदारपदी संजीव देसाई यांना कायम ठेवण्यात आले आहे.

पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका झाल्यानंतर व प्रदेशाध्यक्षांची निवड झाल्यानंतर कार्यकारिणी कधी जाहीर होणार, याची विचारणा केली जात होती. प्रदेशाअध्यक्ष दामोदर ऊर्फ दामू नाईक यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या परवानगीने ही राज्य कार्यकारिणी जाहीर केली आहे.

2025-2028 या तीन वर्षांसाठी ही कार्यकारिणी आहे. प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, उपाध्यक्ष दत्तप्रसाद खोलकर, अ‍ॅड. नरेंद्र सावईकर, कुंदा चोडणकर, अ‍ॅड. विश्वास सातरकर, ग्लेन सौझा टिकलो व बाबू कवळेकर. सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येकर व सर्वानंद भगत. सचिव दयानंद सोपटे, दीपक नाईक, आरती बांदोडकर, धाकू मडकईकर, संजना वेळीप व रानिया कार्डोसो, खजिनदार संजीव नारायण देसाई, सहखजिनदार : पुंडलिक राऊत देसाई, माध्यम संयोजक सिद्धेश श्रीपाद नाईक, मुख्य प्रवक्ते आमदार कृष्णा साळकर, आयटी विभाग प्रमुख गिरीराज पै वेर्णेकर, सोशल मीडिया संयोजक शुभम पार्सेकर, कार्यालय सचिव सुधीर पार्सेकर यांचा समावेश आहे. त्यासोबतच मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदार असे 38 जण कायम निमंत्रित पदाधिकारी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT