CM Pramod Sawant pudhari photo
गोवा

CM Pramod Sawant | भाजपची विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवा

CM Pramod Sawant | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : पणजीत भाजप गोवा प्रदेश सोशल मीडिया कार्यशाळा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
सरकारी योजना, विविध उपक्रम आणि विकास प्रकल्पांची माहिती व्यापक जनसमुदायापर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर, सर्जनशील आशय आणि डिजिटल माध्यमावरील सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून भाजप सरकारची विकासकामे आणि योजना लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपच्या सोशल मीडिया कार्यकर्त्यांना केले.

भाजप मुख्यालय असलेला अटल भवन येथे मंगळवारी रात्री आयोजित भाजप गोवा प्रदेश सोशल मीडिया कार्यशाळेत मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, भाजपचे राष्ट्रीय सोशल मीडिया संयोजक दीपक म्हस्के, राष्ट्रीय सोशल मीडिया सहसंयोजक प्रीती गांधी, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. नरेंद्र सावईकर तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सकारात्मक, वस्तुनिष्ठ आणि जबाबदार संवादाच्या माध्यमातून डिजिटल माध्यमावरील पक्षाची पोहोच अधिक मजबूत करावी, लोकांशी सक्रियपणे संवाद साधावा आणि गोव्यात सुरू असलेली विकासकामे प्रभावीपणे जनतेसमोर मांडावीत, असे प्रोत्साहन मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिले. यावेळी दामू नाईक, दीपक म्हस्के आणि प्रीती गांधी यांनीही सोशल मीडिया कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भाजपच्या डबल इंजिन सरकारची विकासकामे आणि विविध योजनांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT