पणजी : उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी भारतातील प्रमुख संस्थांपैकी एक असलेल्या बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (बीआयटीएस /बिट्स) पिलानीने देशभरातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे (एमएसएमई) प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च संस्था लघु उद्योग भारती (एलयूबी) नॅशनलसोबत एक धोरणात्मक सामंजस्य करार (एमओयू) केला. हे सहकार्य भारतातील एमएसएमई क्षेत्रात नवोपक्रम, तंत्रज्ञानाचा अवलंब आणि क्षमता निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
हा सामंजस्य करार एका हायब्रिड समारंभाद्वारे करण्यात आला, ज्यामध्ये एलयूबीचे राष्ट्रीय नेतृत्व ऑनलाइन सामील झाले आणि एलयूबी गोवा राज्य संघ बिट्स पिलानी के के बिर्ला गोवा कॅम्पसमध्ये प्रत्यक्ष उपस्थित होता. एलयूबी गोवा शिष्टमंडळात अध्यक्ष पल्लवी साळगावकर, सरचिटणीस मुदित अगरवाल, कोषाध्यक्ष विभोर केणी, योगिश कुलकर्णी आणि जयेश रायकर, बिट्स पिलानी के के बिर्ला गोवा कॅम्पसच्या संचालक प्रा. सुमन कुंडू, बीजीआयआयईएसचे प्रभारी प्राध्यापक अनिर्बन रॉय, इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिलचे संयोजक प्रा. सरोज बराल, संशोधन आणि नवोपक्रमाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. शिबू क्लेमेंट, प्रॅक्टिस स्कूलचे प्रभारी प्राध्यापक अमोल देशपांडे, केमिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. एस. डी. मांजरे, बीजीआयआयईएसच्या व्यवस्थापक डॉ. श्रीदेवी जयस्वाल आणि बीजीआयआयईएसच्या ईशा देसाई आदी उपस्थित होते.
बिट्स नेटवर्कमधील वरिष्ठ नेते देखील व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी झाले होते. ज्यात बिट्स पिलानीचे रजिस्ट्रार कर्नल एस. चक्रवर्ती (निवृत्त), प्रो. सौनक रॉय, डीन - रिसर्च अँड इनोव्हेशन आणि रजनीश कुमार, हेड - टेक्नॉलॉजी ट्रान्सफर ऑफिस. एलयूबीचे राष्ट्रीय प्रतिनिधी ऑनलाइन सामील झाले. यामध्ये अखिल भारतीय अध्यक्ष मधु सुदन दादू, अखिल भारतीय सरचिटणीस ओम प्रकाश गुप्ता, राष्ट्रीय समन्वयक (उद्योग-शैक्षणिक) जयंती गोएला आणि डॉ. अर्शप्रीत कौर, टीओटी समन्वयक यांचा समावेश होता.