लुथरा बंधूंना न्यायालयातून कोलवाळ कारागृहात घेऊन जाताना पोलिस सुरक्षा कर्मचारी. 
गोवा

Goa Luthra brothers surrender|लुथरा बंधू, अजय गुप्ता व तरुण तेजपाल म्हापसा न्यायालयात शरण, कोलवाळ कारागृहात रवानगी

Birch club Goa case | लुथरा बंधू, अजय गुप्ता व तरुण तेजपाल म्हापसा न्यायालयात शरण, कोलवाळ कारागृहात रवानगी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ अग्निकांड प्रकरणातील संशयित गौरव लुथरा, सौरभ लुथरा आणि अजय गुप्ता तसेच महिला सहकारी कर्मचाऱ्यावरील लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपी असलेले तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल हे आज म्हापसा न्यायालयात शरण आले. न्यायालयाने त्यांची रवानगी कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात (न्यायालयीन कोठडीत) केली.

सर्वोच्च न्यायालयाने संशयित लुथरा बंधू व अजय गुप्ता तसेच उच्च न्यायालयाने १० वर्षाची शिक्षा ठोठावलेल्या आरोपी तरुण तेजपाल यांचे आव्हान अर्ज फेटाळताना त्याना न्यायालयाला शरण जाण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दोन वेगवेगळ्या प्रकरणात या तिघांनी आज म्हापसा न्यायालयात हजेरी लावली.

गौरव बंधू व अजय गुप्ता याना म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाने दिलेल्या सशर्त जामिनाला तसेच म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने तरुण तेजपाल याला निर्दोषत्व ठरवलेल्या निवाड्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने गौरव बंधू व अजय गुप्ता यांचा जामीन रद्द करून तसेच तरुण तेजपाल याचे निर्दोषत्व रद्द करून १० वर्षाची शिक्षा ठोठावली होती.

या दोन्ही प्रकरातील संशयितांना न्यायालयात आत्मसमर्पण करण्यास मुदत दिली होती. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र दिलेल्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन त्यावर शिक्कामोर्तब केले होते.

लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तरुण तेजपाल याने उच्च न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला आव्हान देण्याबरोबरच न्यायालयात आत्मसमर्पण करण्यास मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळली होती. त्याला अगोदर आत्मसमर्पण करण्यास सांगितले व त्यानंतर त्याने आव्हान दिलेल्या शिक्षेची याचिका सुनावणी घेतली जाईल असे स्पष्ट केले होते. त्यामुळे तेजपाल याला आत्मसमर्पण करण्यापासून पर्याय राहिला नव्हता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT